Sunday, September 2, 2012

कथा सृजनाची


विसरायचे होते सल मनातील 
पण त्यांचीच पुन्हा आठवण झाली
ओघळले कढ,सरला  आवेग 
डोळ्यात आसवांचीच साठवण झाली 

विसरण्या मनीची मूर्त लोटले कवाड 
उजाड भिंतीवरील ती दर्पण झाली 
घालूनी वळसा सोडला गाव मागे 
पण त्या मुशाफिरीत वणवण झाली 

सत्संग त्याग कथा सृजनाची 
माझ्या मनी तीच निरुपण झाली.