पण मग आपल्या याराजभाषेची आजची परीस्थीती यावर आपण अंतर्मुख होतो. वेगाने कमी होत चाललेल्या
महानगरातील मराठी शाळां बाबत हळहळ व्यक्त करतो.
मग लक्षात येते कि आपले व्यक्त होणेच कमी होत चालले आहे आणि म्हणूनच आपण हा दिवस नक्कीच साजरा केला पाहिजे,जे मनात येते, बोलावे वाटते ते कागदावर उतरले पाहिजे. आपण जितके मनमोकळं व्यक्त होऊ तितकी आपली भाषा सकस होईल
आपण वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होऊ आणि आपले भाषा ज्ञान समृद्ध होईल.विचारांची गुंफण शब्दांचा मोत्यात केली कि खरोखरच त्यातुन सुंदर रास तयार होईल.आणि नव कल्पनांचा महासागर आपल्या भेटीला येईल.आणि मग आपणही कुसुमाग्रजांना स्मरून म्हणत राहू कि - अनंत आमुची ध्येया सक्ती अनंत आमुची आशा, किनारा तुला पामराला...
No comments:
Post a Comment