Sunday, August 5, 2012

सागरतिरी .......


चालताना सागर किनारी ,वाळूत उमटती पाऊलखुणा 
लाट त्यावरून जाता, पुसट होतसे ठसा पुन्हा  

पारदर्शी लाट अलगद,पसरी  पडदा धूसर नितळ 
घाव त्याचा कातर करी, गतस्मृतींचा कभिन्न  कातळ 

चुकवता त्या अलवार लाटा , घेती  नव्याने  वळण पाऊले 
परिस्थितीने सहज बनविले, अज्ञाताच्या हातचे बाहुले 

बदलता मार्ग नव्याने, दूर राहिला सागर किनारा 
कडे कपारीतील झुळूक, वाहून आणते गंधित वारा

त्या वाऱ्याने  त्याचे, पुन्हा  केले असे भिरभिरे
आसवातल्या धुलीकणांनी, नजर त्याची लागू चुरचुरे 

थबकला  सहजच त्या वळणावर,
अन नेत्रातून  टपकला मोती 
पायी त्याच्या अलगद पसरली
शिंपल्याची रास होती 


 

No comments:

Post a Comment