बोलविता 'तिने' धावलो मनाने ।
चालला देह वारीसंगे ।
खुण गाठ मनाशी। पोचता पंढरीशी।
घेईल 'माउली' मजशी उराशी ।।१।।
गेला जन्म दुखः भोग यात ।
संपली हयात हीच यातायात ।
तरी त्याची आस असते मनात ।
देईल 'बाप' सावली जराशी ।।२।।
वारीचा अट्टहास । घडवितो उपवास ।
गजर नामाचा हाच एक श्वास ।
संपता खडतर वाट कैवल्याची ।
दिसे 'मायबाप' मज पंढरीशी ।।३।।
No comments:
Post a Comment