भेटीलागी जीवा लागलीसे आस ...
दिनांक ३१ डिसेंबर २०१० या दिवशी मी ' मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने ' या ब्लॉग लिखाणास सुरवात केली . प्रथम लेखांचा / कवितांचा किंवा काहीतरी लिहीत राहण्याचा वेग बरा होता. पण गेली दोन तीन वर्षे लिखाण जवळ जवळ थांबलेच .
पण आता पुन्हा काही तरी लिहीत राहावे . जरा मनमोकळेपणाने व्यक्त व्हावे असे वाटायला लागलेय म्हणून पुन्हा सुरवात करायचे ठरवलंय . बघू कसे जमतेय . बरेच दिवस कोरा असलेला कॅनव्हास काही रंग भरले तर बोलेल का ? त्यावरचे चित्र मनोगत उलगडून दाखवण्यास समर्थ ठरेल का ? अशा काही शंकांनी मन भरून गेले आहे . पण रेखाटन केल्याशिवाय जसे चित्र पूर्ण होत नाही तसे मनातील भावनांना शब्दरूप दिल्याशिवाय मनास . हलके वाटत नाही हेच खरे .
जेंव्हा ब्लॉग लिखाण सुरु केले तेंव्हा आपला ब्लॉग कोणी वाचेल का ? अशी एक पुसटशी शंका मनात होतीच . नियमित लिखाण असताना एक ते आठ हजार पर्यंत वाचकांच्या भेटी टप्या टप्याने होत गेल्या पण लिखाण थांबल्यानंतर देखील होणाऱ्या वाचक भेटीने अकरा हजार भेटीचा टप्पा गाठला आणि पुन्हा काहीतरी लिहावे या विचारांनी उचल खाल्ली .
तर मग आता किमान महिन्यातून दोनदा मी आपणास भेटणार , म्हणजे मी आता पुनर्भेटीस येत आहे . कधीआनंद देणार तर कधी कंटाळून टाकणार ( बोअर करणार ), बघू आता त्यात तरी नियमीत पणा ठेवता येतोय का ?
कारण आपल्या पुनर्भेटीची ओढ मलाच स्वस्थ बसू देत नाही म्हणून मी पुन्हा ब्लॉगकडे वळालोय , तर करणार ना स्वागत माझ्या स्वनिमंत्रित भेटीचे ?
No comments:
Post a Comment