अरेच्या! एक तर याला काही माहिती नाही किंवा लिहताना चूक केलेली दिसते, यापैकी काय वाटले आपल्याला. मनात असा विचार येणे यात चूक काही नाही,कारण मूळ रचनेची सुरवात आहे ती अशी आहे ---
सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
अर्थात हे सुरेल अर्थपूर्ण गीत आणि त्यातील संदेश पूर्णता योग्यच आहे. पण या सुसंगातीवरून मी विसंगतीकडे का आलो ते मी आता सांगतो. नुकतेच माझ्या वाचनात एक वेगळ्या विषयावरचे पुस्तक आले. त्या पुस्तकाचे नाव आहे- " OXYMORONICA" - paradoxical wit and wisdom from history's greatest wordsmiths लेखक - Dr. Mardy Grothe.
या पुस्तकात लेखकाने विचारांच्या सुसंगतीतून विसंगतीतील सौंदर्य टिपले आहे असे मला वाटतेय. मला स्वतःला इंग्लिश वाचनाचा छंद वगैरे अजिबात नाही. उलट बरेचदा काही शब्दांच्या अचूक अर्थासाठी मी डिक्शनरीचा आधार अनेकदा घेत असतो. असे असून देखील या पुस्तकाने मला वेडे केले. या पुस्तकात जो खजिना दडला आहे त्याचा रस्ता आपणास दाखवणे आणि तो आपणास मिळाला तर आपणही नक्कीच श्रीमंत व्हाल याची खात्री वाटली, म्हणून या पुस्तकाचा अल्प परिचय मी आपणास करून देत आहे. आणि मूळ पुस्तक वाचून त्याचा खराखुरा आनंद मिळावा म्हणून परिचय जाणीवपूर्वक अल्पच ठेवणार आहे.
या पुस्तकातील सौंदर्य स्थळे शोधून त्याचा आनंद घेण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकेल.काही जण वाचनानंतर त्यातील काही विचार मनात कोरून ठेवून त्याचा आनंद घेतील,काहीजण त्यावर चर्चा करून अनुभव समृद्ध होतील. काही जण आपल्या आवडीचा विभाग पुन्हा पुन्हा वाचून आनंदाचा पुनःप्रत्यय घेतील. इतकेच काय पण काही जण स्वानुभावातील जगाला उलगडून सांगतील. इतके सर्व यात दडले आहे म्हणून मी त्यास खजिना म्हटले आहे.
मूळ पुस्तक इंग्लिश भाषेतील असल्याने काही माहिती मूळ भाषेत नोंदवून मगच माझे मत सांगणार आहे पण माझे मत किंवा पुस्तकावरील भाष्य हे कोणत्याही अधिकारातून नसून केवळ विचारांच्या अभिव्यक्तीपोटी केले आहे हे माझे आपणास नम्र सांगणे आहे.
पुस्तकाचे सुरवातीस लेखकाने - When people are asked to discribe an oxymoron, they almost always think of a " contradiction in terms " like jumbo shrimp, acting naturally, pretty ugly, असे म्हणत,पुढे काही प्रथितयश लोकांची सर्वमान्य झालेली काही वाक्ये दिलेली आहेत.
जसे-1. I am deeply superficial.
2. Even his ignorance is encyclopedic.
3. I love my country too much to be a nationalist.
म्हणजेच या वाक्यातून दिसणारे शब्द परस्पर विरोधी असू शकतात. पण एकत्रितपणे ते खूप वेगळा अर्थ मांडताना दिसतात. माझे हे म्हणणे स्पष्ट व्हावे म्हणून पुस्तकातील काही भाग मी इथे मुद्दाम देत आहे.
All of these quotes contain a juxtaposition of oppsing terms. They may be described by the adjective oxymoronic because they are characterized by or related to the rhetorical figure called oxymoron. The Oxford English Dictionary defines oxymoron this way:
A rhetorical figure by which contradictory or incongruous terms are conjoined so as to give point to the statement or expression; an erprssion in its superficial or literal meaning self contradictory or absurd, but involving a point.
The word , which appers in English for the first time in 1640, has an interesting etymology. In ancient Greek oxus means " sharp or pointed"and moros means "dull, stupid, or foolish." So oxymoron is itself an oxymoron , iiterally meaning " ashrap dullness " or " pointed foolishness. "
Technically , the correct plural form of the word is oxymora, but so many people say oxymorons that ( except for purists ,pedants, and yours truly ) it is now generally regarded as an acceptable usage.
The best examples of oxymoronica don't contain a simple contradiction in terms; they contain what might be discribed as a contradiction in ideas. Many oxymoronic observetions stretch our minds and expand our thinking;
Free love is too expensive.- BERNADETTE DEVLIN
Melancholy is the pleasure of being sad. - VICTOR HUGO
Observations like these are usually called paradoxical, and all are consistent with one of the definations of the word paradox:
A statement that seems self- contradictory , false, or absurd but is nonetheless well-founded or true.
paradox या शब्दाचा आढळ इंग्लिश भाषेत प्रथम १५४० झालेला आढळतो.म्हणजेच oxymoron या शब्दाच्या वापरापूर्वी सुमारे १०० वर्षे याचा वापर दिसतो. paradox या शब्दाचा उगम पुराणकाळातील दोन ग्रीक शब्दांमधून झाला आहे. त्यातील para म्हणजे beyond आणि dox म्हणजे opinion . म्हणजेच paradox चा शब्दशः अर्थ जरी beyond opinion असा असला तरी या शब्दाचा मुळ स्त्रोत " being beyond the pale of current opinion" or " contrary to current thinking."हा अर्थ दाखवतो. सुरवातीचे काळात अशा शब्दांचा वापर अभूतपूर्व अविश्वासानिय गोष्टी उलगडून सांगण्यासाठी केला गेला. प्रतिभावान नाटकर, साहित्यिक शेक्सपियर यांनी त्यांच्या 'अथेल्लो' या नाटकात केला आहे.
इतिहासातील अनेक उदाहरणे याप्रकारत आढळतात.
Less is more.
The more things change, the more they remain the same.
To lead the people, walk behind them. या सारखी वाक्ये आणि त्याचा गर्भित अर्थ उलगडून सांगणारी लेखकाची प्रतिभा यांनी हे पुस्तक अक्षरशः भरून वाहते आहे.
हि थोडीफार माहिती मी आपणासमोर मांडताना संपूर्ण पुस्तकातील सुरवातीचा ओळख करून देणारा भागच मांडला आहे. पुढे या पुस्तकात लेखकाने विषयाची मांडणी विभागवार करून पुस्तकास नेटके रूप देत विषय अधिकच सोपा करीत नेताना तो उत्कंठावर्धक केला आहे. वेगवेगळ्या विभागात मांडलेला हा विषय -
Oxymoranic Wit & Humor, Ancient Oxymoranica, Artistic Oxymoronica, या सारख्या चौदा विषयांना स्पर्श करतो.
या पुस्तकाचे वाचनातून मला काय मिळाले?असे मी स्वतःस विचारले आणि उत्तर म्हणून मला जे अगदी सहज सुचले ते मी आपणास सांगत आहे.
१. मी आरशात डोकावले असता, मला मीच त्यात दिसत नाही.
२. मी पावसात जातो पण तो मला भिजवत नाही.
३.परिचित ठिकाणी मी नेहमीच हरवतो.
४. तुमचे सर्वाधिक नुकसान करणारा व्यवहार नेहमीच फायदेशीर असतो.
५.मी विचार करणे सोडून दिले कि मला नवीन कल्पना सुचतात.
यातील काही कल्पना आपणास पूर्वी कधी आढळल्या असतील, तर तो केवळ योग योग असून केवळ विचारांच्या प्रक्रियेतील साधर्म्य समजावे. पण त्यापलीकडे जावून माझे इतकेच सांगणे आहे कि, आपण हे पुस्तक जरूर वाचा.
पुस्तक मिळण्याचे ठिकाण - Special Markets department, Harpercollins Publishers Inc.
10, East 53rd Street, New York, NY 10022.
No comments:
Post a Comment