"तिळाचा ओलवा गुळाचा गोडवा
संक्रांतीच्या दिवशी एक मित्र जोडावा"
संदेश हा संक्रांतीचा थोरांनी दिला,
'जोडण्यासाठी मित्र,जीव लागतो जडावा
जगण्यासाठी मैत्र, पीळ लागतो पडावा'
मनात आले असे म्हणत....
काटेरी हलवा त्याने तुझ्या हाती दिला......
जीव् त्याचा तुझ्यासाठी तिळ तिळ तुटेल
कळणार नाही तुला काय त्याला वाटेल
मन त्याचे तुजसाठी काय काय मागते
"हलव्याचा गोडवा लाभू दे तुला
काटे त्याचे होवू देत लखलाभ मला"
गोड तुझ्या हसण्याने, पतंग त्याचा भरारेल
दोर तुझ्या हाती देत झेपेल तो आकाशी
कधी न येवो संक्रांत आपल्या नात्यावर ...
गुणगुणेल तो मनाशी
No comments:
Post a Comment