डायरीतील नोंद-- असलेली
गुरुवार -
श्री क्षेत्र महाबळेश्वर दर्शन
जीवनाचे बिल्बपत्र अर्पण करण्याची कल्पना
रम्य निसर्ग पंच नद्या सनातन जीवन दायिनी कृष्णा व आधुनिक विज्ञान वाहिनी कोयना
देवस्थान ब्रह्मारण्य अतिबळ, महाबळ लिंगा मध्ये नद्यांचे साक्षात्कार ---देवस्थान उत्त्पन्न ,सेवा विशेष शिसवी चंद्र राव मोरे नाग वीज ट्रस्टी
पायी प्रतापगडाकडे मधल्या वाटेने प्रयाण व वाड्याकडील पायथ्याशी रोशी मुक्काम
शुक्रवार -
वाड्यावरून मधल्या वाटेने प्रतापगडाकडे आईचे स्नान करून दर्शन फार दिवसांची इच्छा पूर्ण. आई तुझे लाडके लेकरू आज तुझ्या कडे आले आहे. शिवस्तुती संध्या काळी मधून अधून वीज परंतु चांदणे प्रचंड वाऱ्याच्या झोतात झोप गारठा तथापि शीण नाही चमकती चांदणी दर्शन शब्दांचा भास.
शनिवार + सोमवार
तटावर ३ तास निश्चल तटावरून उडी घेशील कां ? विचारले गेले हो म्हणालो पापणीही हलवायची नाही निविकल्प समाधी समाधीत रामकृष्ण हे नाव (अभेदानंद) एक साप मी इथेच बसतो तिकडे साप न येता बिळात.
जंगलात जीवनाचे उद्दिष्ट कोणते? विश्वाची नियतीशक्ती तिचा शोध बोध घेणे whether दक्षिणेश्वराकडे. माझा भूतांवर विश्वास नाही if दक्षिणेश्वर पथ्ये
३ दिवसांपेक्षा जास्त मुक्काम नाही.
वार स्नान व भवानी मातेच्या मंदिरात. राम कृष्ण विवेकानंद अभेदानंद असा जप गाभाऱ्यातून आवाज समग्र प्रतापगड दर्शन "क्ष" भेट
केंव्हा जाणार ? पृच्छा सातारच्या महाराजांची हि मिळकत असून माझ्यापासून कोणालाही त्रास नाही त्रासाचे उदाहरण न दाखविता धक्के मारून काढण्याची भाषा . केदारेश्वर दिवा नाही शिवाजी महाराज साक्षात शिवाचे अवतार साष्टांग नमस्कार दंडेलीच्या भाषेने राम कृष्ण पुरे पडतील काय? हा विचार. बंद दरवाजा नजीक बाहेरील बाजूस मुक्काम रात्रो गडावरून विचारपूस तेंव्हा तुम्ही ज्याला दुखः मानता त्याला आम्ही सुख मानतो असे उत्तर दिले आपुलकी बद्दल आभार मानले.
वार प्रतापगडाकडून वाड्याकडे येताना बहुधा फकीर नावाचा एक जन भेटला. मुले विचारात नाहीत असे त्याचे म्हणणे अफझलखान कबरी जवळ यांनी( Possibly मुस्लीम ) नाव गाव न पुसता १ रु. भेट म्हणून दिला(अल्ला तेरा भला करो)आशीर्वाद. पुराणिक यांनी काळ जेवणखाणाबद्दल चौकशी केली होती आज त्यांच्या कडे वडा खाताना म्हाताऱ्याने पुन्हा प्रपंचात जावून पडण्याचा सल्ला दिला मीही आता सध्या निरुपयोगीच आहे तुम्हीही आपल्या मुलांबाळाकडून मिळेल ते संतोषाने खाऊन राहा. डोक्यात राख घालू नका .
I have said nothing त्यांचे आभार मानून देव करता करविता त्यांच्या बुद्धी प्रमाणे वागणार असे म्हणालो. वाड्यावरून चालत प्रयाण. वाटेत खेड्यात जेथे वाहतुकीची साधने पोचली नाहीत व माणुसकी शिल्लक आहे असा सुमारे ५० वर्षाचा म्हातारा भेटला. पृच्छा. देवासाठी घरदार सोडले हे त्यास खरे वाटले नाही. माणूस भाऊबंदांच्या भांडणाने घरदार सोडणार नाही पण (जीवाची सखी) बायको मुळे सोडेल. तेंव्हा बायकोस दोष द्यावयास जागा नाही असे म्हणालो त्याने जाताना भाकरीची (नाचणी) सोय केली. निरोगी दष्टपुष्ट गाय व तिचे वासरू ( as if काली रामकृष्ण ) यांचे दर्शन ...
One above can see all पुरावा Luxury bus पायी चार मैल चालेन असा अंदाज भगवंताने ७.५ मैल चालवले वस्ती कडे दिव्यांच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न परंतु मध्येच जंगलात मुक्काम.
.......... X ...... X ........X .......
डायरीतील नोंद-मला समजलेली – पहिल्या भाग एक ते भाग सहा मध्ये,बाबांचा प्रवास जरी कोथरूड ते सातारा मार्गे स्वारगेट इतकाच असला तरी मनाने ते त्यांचे बालपण फिरून आले.आई तिचा अकाली मृत्यू त्यांचे पुण्यास येणे,नातेवाईकांकडून आलेले अनुभव, चुलत आजोबांनी पुढील शिक्षणासाठी घरी ठेवून घेणे,थोरल्या बहिणी पासून ते पत्नी पर्यंत नातेसंबंधाने झालेली मानसिक आंदोलने असा त्यांचा पस्तीस वर्षांचा प्रवास नोंदला आहे. सातारा ते महाबळेश्वर ते कसे आलेत याची नोंद नाही.पण महाबळेश्वर आणि त्यापुढील कल्याण पर्यंतचा प्रवास,त्यांनी पायी केला आहे. तो काळ हा त्यांच्या मनस्थितीचा अंदाज केल्यास त्यांनी परिसर निसर्ग आणि माणसे यासह पुरेपूर अनुभवला पण नोंदी मात्र तुलनेने तटस्थपणे केल्या आहेत. तसेच डायरीतील प्रत्येक नोंद मुळात जशी आहे तशीच ठेवताना संपूर्ण सत्य सांगणे आणि अन्वयार्थ कुवतीनुसार काय वाटते ते सांगताना काढणे हेच तंत्र अखेरपर्यंत पाळावयाचे ठरवले आहे.
काळ १९७०/७१ चा.त्याकाळी महाराष्ट्राचा ग्रामीण परिसर तुलनेने अधिक वनांनी व्यापलेला होता. त्यामुळे तेंव्हा महाबळेश्वर व त्यापुढे रायगड जिल्ह्यातून त्यांनी केलेला प्रवास बहुतांशी पायी आहे.आणि नंतर कल्याण ते कोलकता हा रेल्वे प्रवास तोही विना तिकीट केला आहे.त्यावरून त्यांनी केलेल्या धाडसाची आपणास थोडीफार कल्पना येईल. आणि त्याच्या प्रवासाला मी धाडस या करिता म्हणतो आहे कारण त्यांचा महाबळेश्वर नंतर सुरु झालेला प्रवास पायी आहे. पण त्याच बरोबर तो चाळीस वर्षांपूर्वीचा आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. तसेच घर सोडताना त्यांनी किती रक्कम बरोबर घेतली याची नोंद नसली तरी नव्वद ते शंभर रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याचेकडे असणे शक्यच नव्हते. पुढे जावून त्यांच्या जवळील रोकड रक्कमेचा झालेला उल्लेख मी ओघातच सांगेन म्हणजे आपणास त्यांच्या प्रवासाची महती लक्षात येईल.
खरे तर घर सोडण्याची मानसिक तयारी असणे आणि घरदार सोडल्याची परिस्थिती प्रत्यक्ष स्वीकारणे यातील अंतर भरून काढणे तसे खुपच अवघड काम आहे. कणखर मनाने निर्णय घेतलेला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे सुरवातीस मन दोलायमान झाल्याचे दिसून येते.त्यामुळे महाबळेश्वर मुक्कामी देव दर्शनानंतर महादेवाचे पिंडीवर बिल्ब पत्र वाहताना त्याच्या मनात सर्वस्व त्यागाची भावना उफाळून आली असावी असे वाटते. त्या सर्वच परिस्थितीचे वर्णन - 'जीवनाचे बिल्बपत्र अर्पण करण्याची कल्पना ' या एका वाक्यातून प्रतिबिंबित होताना दिसत आहे. येथून पुढील प्रवास हा पायी असल्याने त्यांनी दररोजचे अंतर कधी पंधरा तर कधी वीस किलोमीटर पर्यंत आक्रमले आहे.म्हणजेच दिवसातील आठ ते अकरा तास त्यांनी पायी चालण्यात खर्चले आहेत. महाबळेश्वर नंतर वाडा मार्गे त्यांनी प्रतापगडाकडे प्रयाण केले आहे. त्याचे करारी वागणे प्रेरणादायी गोष्टीची तीव्र ओढ यामुळे गड आणि परिसर याची त्यांना भुरळ पडल्याचे जाणवते. भवानी मातेचे दर्शन घेतल्यावर ते देवीचे दर्शन घेतले असे न म्हणता आईचे दर्शन असे लिहून ठेवतात. आणि प्रतापगड त्याचा इतिहास यापुढे नतमस्तक होताना ते स्वतः बरोबरच एक वेगळा संवाद साधताना दिसतात.तेथील निसर्ग व परिसर याच्याशी तद्रूप होताना त्यांनी किती एकाग्रता ठेवली हे त्यांच्या- 'तटावर ३ तास निश्चल तटावरून उडी घेशील कां ? विचारले गेले, “ हो म्हणालो”,पापणीही हलवायची नाही निविकल्प समाधी' या नोंदीतून जाणवते. प्रवासाचे सुरवातीस असलेली जीवन संपवण्याची कल्पना मागे पडून,आता कोणतेही धाडस करण्याची मनस्थिती या नोंदीतून जाणवते त्यामुळे तटस्थ बसल्यावर आलेल्या सापाचे देखील भय त्यांना वाटले नाही.
मात्र याच काळात विविध नमुन्याची,माणसे कशी पदोपदी भेटत होती.ते सर्व जण त्यांच्याशी कसे वागले याचा प्रत्यय या सुरवातीच्या नोंदीपासून दिसत आहे.त्यामुळे गडावरील देवळातील मुक्काम न आवडलेला कोणी,जेंव्हा धक्के मारून हाकलण्याची भाषा करतो तेंव्हा हि जिगर किंवा अशी जिद्द जार परकीयांची आक्रमणे झाली तेंव्हा मराठी माणसांनी दाखवली असती तर इंग्रजांचा अंमल भारतावर झालाच नसता असे मला वाटले. कोणाकडून अनपेक्षित मदतीचा हात पुढे तर कोणाचा संसारात परत जा हा सल्ला. म्हणजे जणू चालती बोलती जीवनाची शाळाच त्यांच्या भोवती उघडली होती. आणि हर एक तऱ्हेचा शिक्षक त्यांना सल्ला देण्यासाठी पावलोपावली भेटत होता असेच मला वाटले. (क्रमशः)
No comments:
Post a Comment