नजरेस पडता तुझ्या अदा
मन झाले तुझ्यावर फिदा
तुझ्या डोळ्यांनी जादू केली
माझ्या डोळ्यातील झोप नेली
तुझ्या गालाची खळी खुलली
माझ्या हृदयात कळ उठली
तू टाकलास कटाक्ष तिरका
मी झालो मलाच परका
पडता तुझे पाऊल पुढे
मज हृदयी श्वास अडे
प्रश्न तिचा," कुठे हरवलास ?
पाहून मजला का भांबावलास?"
प्रश्नाने तिच्या पडले कोडे
परमेश्वर घालतो का कधी भक्ताला साकडे
No comments:
Post a Comment