Friday, March 16, 2012

हाय!

चालतो नेहमीच नाकासमोर,घालून खाली मान
तरीही 'पाताळधुंडी' म्हणून करती माझा  सन्मान 


नकोच चर्चा, नकोच चर्वण म्हणुनी माझे मौन असे 
तरीही लोक म्हणती हा तर मतलबी दिसे 

नकोच मैत्र, नकोच समूह,म्हणून मी गर्दीत नसे 
तरीही लोक म्हणती,नेहमीच हा का अलिप्त भासे 

कुणीही नाही घेतले समजून हाच एक सल असे 
अंतर्मुख राहूनही त्यांना आतली गाठ दिसे 

वाटले हि अवहेलना संपेल आता सरणावरी
पण हाय! तिथेही हे धुमसले ओल्या लाकडापरी

No comments:

Post a Comment