आपण ब्लॉगवर आपल्या आवडीची पुस्तके त्यातून येणारे भारावलेपण यावर नेहमीच वाचत असतो. काही जण आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगतात, काही जण त्यातील एखादा उतारा देतात. काही जण परीक्षण मांडतात.या सर्व प्रकारातून आपली पुस्तक वाचण्याची जिज्ञासा वाढीस लागते . माझे अमराठी वाचन तसे मर्यादित आहे. किंवा खरे म्हणाल तर बैठक मारून संपवलीत अशी इंग्लिश पुस्तके हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. पण त्यातील- THE FREEDOM WRITERS DIARY.हे पुस्तक मला खूपच आवडले. आपणास हि त्या पुस्तकाबाबत उत्सुकता वाटावी म्हणून, त्या पुस्तकाची प्रस्तावना(अंशतः) मी भाषांतरित करून आपणासाठी देत आहे.मला वाटतेय कि या प्रस्तावनेच्या वाचनानंतर आपण हे पुस्तक नक्कीच वाचाल.
प्रस्तावना-झेल्ता फिलीपोविक
जेंव्हा मला "दि फ्रीडम रायटर्स डायरी" या पुस्तकासाठी प्रस्तावना लिह्ण्याबाबत विचारण्यात आले, तेंव्हा प्रथम हे मला सांगितले पाहिजे कि,मला तो असा गौरव वाटला कि ज्याचा मला अभिमान आहे,परंतु त्याच वेळी मी भारावून जावून विचार करू लागले कि इतक्या अल्पावधीत किती आश्चर्यकारक घटना घडत आहेत.
१९९६ च्या मार्चमध्ये मी विल्सन हायस्कूलच्या शाळकरी मुलांना (विद्यार्थ्यांना) त्यांची भविष्यावरील श्रद्धा, समर्पणवृत्ती,आणि प्रयत्नवाद याकरिता त्यांचे आभार मानण्यासाठी भेटले. माझ्या बरोबर त्यांनी माझे पालक,माझी मैत्रीण मिरना ( जी बोस्नियात असल्यापासून माझी मैत्रीण आहे, आतासुद्धा जी माझ्या बरोबर आहे ) यांना लाँग बीच , कॅलिफोर्निया येथे आमंत्रित केले होते. मी जेंव्हा त्यांना प्रथम भेटले तेंव्हा त्यांच्या कनवाळूपणा व मायेने मी भारावून गेले. ते सर्वजण माझ्याच बरोबरीचे नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले होते, जगभरातील असंख्य तरुणांसारखेच ते हि होते,त्यांच्या मध्ये खऱ्या अर्थाने मोठे होण्याची नेतृत्व करण्याची ताकद होती, जी इतरांना प्रेरणा देईल.
हे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका एरीन ग्रुवेल यांनी अॅन फ्रंन्क हिची- " दि डायरी ऑफ यंग गर्ल ,माझे पुस्तक - झेल्ताज डायरी : ए चाइल्ड लाइफ इन साराजेवो आणि इतर अनेक पुस्तके यांचे वाचन केले ज्यामधून त्यांना त्यांची रोजनिशी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वतःला ऑरगनाइज्ड करत काहीतरी वेगळे करण्याची, काहीतरी चिरस्मरणीय करण्याची काहीतरी ताकदीचे व मानवतावादी काम करण्याचे ठरवले.त्यासाठी त्यांनी सहजतेने पुढे जाण्याचा मार्ग निवडण्याचे ठरवले, त्याप्रमाणे त्यांनी केले लिखाणातून भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यातून त्यांनी प्रस्थापिता विरुद्ध लढाई पुकारली आणि खऱ्या अर्थाने स्वतःचे "फ्रीडम रायटर्स" हे नाव सार्थ केले.
मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान तर आहेच पण त्याच बरोबर आणखी एका गोष्टीचा आनंद देखील आहे तो म्हणजे त्यांच्या जडण घडणीच्या प्रगतीमध्ये माझा खारीचा वाटा आहे.
मी माझी रोजनिशी लिहिण्यास सुरवात बोस्नियाचे युद्ध सुरु होण्यापूर्वी केली होती, कारण मला माझ्या बालपणीच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी व मागे वळून पाहत रममाण होण्यासाठी त्यांची गरज होती. मला माझी रोजनिशी वाचताना जुन्या आठवणीत रंगून जाताना हसायचे होते,रडायचे होते, सदगतीत व्हायचे होते. मला माझ्या डायरी बरोबर मी कशी वाढले ते अनुभवायचे होते. माझ्या काही मोठ्या मैत्रिणी डायरी लिहित आणि वाचनात आलेल्या अन फ्रांक ,अदरिअन मोल यांच्या डायऱ्या यामुळे माझी खात्रीच झाली होती कि डायरी लिहिणे हि योग्यच गोष्ट आहे. मी कधीही कल्पनादेखील केली नव्हती कि माझी डायरी प्रकाशित होईल, आणि माझी डायरी एका युद्धाची रोजनिशी व्हावी अशी तर बिलकुल इच्छा नव्हती. माझे बालपण अचानक थांबेल असे कधी स्वप्नात देखील वाटले नाही. मात्र या घटनांनी अघटीत घटनांबद्दल विचार करण्याची सवय लावली. कारण मनुष्य स्वभाव असा असतो कि दुर्घटना/संकटे हि इतरांवर येतात अशी त्याची धारणा असते. पण जेंव्हा प्रत्यक्षात दुर्देवाचा घाला पडतो तेंव्हा तो स्वतः घाबरलेला,दुखी:, गोंधळलेला रागावलेला असा बनतो.
जेंव्हा बोस्नियाच्या महाभयंकर युद्धाला प्रत्यक्षात सुरवात झाली तेंव्हा माझे आनंदी आणि सुरक्षित बालपण संपुष्टात आले, आणि माझी डायरी हि रोजच्या घटना नोंदवण्याच्या पलीकडली बाब झाली. ती माझी खरीखुरी मैत्रीण झाली. मी जे काही बोलेन ते ऐकण्यासाठी,माझे प्रश्न समजून घेण्यासाठी, माझी भीती,माझे दुखः स्वीकारण्यासाठी ती कायम तयार होती.मला माझ्या लिखाणातील आनंद उमजला---
No comments:
Post a Comment