विसरायचे ठरवता मन तिला आठवते
आठवायचे ठरवता का म्हणून विसरते,
आज अचानक आली तिची मूर्त डोळ्यासमोर
अश्रूंचा पूर थोपवला पापण्यांवर!
वाहु दे! म्हटले तरी वाहत नाहीत आता डोळे
नजरे समोर साकारतात फक्त तिचे भाव भोळे,
का म्हणून काळीज गलबलले या सांजवेळी
देवा समोर ज्योत लावून काय मागत असेल अशावेळी!
काय असतील तिच्या भावना आता अशा अवेळी
अंतःकरणी राहतो सल, पण सुकलेले डोळे म्हणती,
आठवांनी फुटू दे बांध, तुटू दे काळीज या काजळ काळी,
पण रड कोरडाच या कातरवेळी........
विसरायचे ठरवता मन तिला आठवते
ReplyDeleteआठवायचे ठरवता का म्हणून विसरते,
छान,
सुंदर लिहिले आहे
माझ्या ब्लॉगचा पत्ता :
http://prashantredkarsobat.blogspot.com/
प्रशांतजी!
ReplyDeleteमनपूर्वक धन्यवाद.
लवकरच आपल्या ब्लॉगला नक्की भेट देईनच.