Friday, March 16, 2012

हाय!

चालतो नेहमीच नाकासमोर,घालून खाली मान
तरीही 'पाताळधुंडी' म्हणून करती माझा  सन्मान 


नकोच चर्चा, नकोच चर्वण म्हणुनी माझे मौन असे 
तरीही लोक म्हणती हा तर मतलबी दिसे 

नकोच मैत्र, नकोच समूह,म्हणून मी गर्दीत नसे 
तरीही लोक म्हणती,नेहमीच हा का अलिप्त भासे 

कुणीही नाही घेतले समजून हाच एक सल असे 
अंतर्मुख राहूनही त्यांना आतली गाठ दिसे 

वाटले हि अवहेलना संपेल आता सरणावरी
पण हाय! तिथेही हे धुमसले ओल्या लाकडापरी

Thursday, March 8, 2012

सलाम

जेंव्हा मी पहिले होते पहिल्यांदा तिला
सलाम मी केला होता विधात्याच्या निर्मितीला
पुढे ती आली अचानक माझ्या आयुष्यात
चित्रगुप्ताला हि ठाऊक नव्हते असे घडेल भविष्यात
तिच्या सोबतीचे काही दिवस भुरकन उडाले
कापराच्या वडी सारखे चटका लावून गेले
आता तिचा प्रवास युवती ते महिला झाला आहे
एका युवकाला प्रौढत्वाकडे घेवून गेला आहे
आजही त्या दिवसांच्या आठवणी तशाच आहेत
हुरहुरीतील शैशव मनोमन जपले आहे
आता पुन्हा जर ती आषाढ घन होवून आली तर ????
मी पुन्हा भिजेन कदाचित ... पण होणार नाही चिंब
आठवणीच्या कुपीतील दरवळेल मृदगंधाचा थेंब

Saturday, March 3, 2012

नजरेस पडता तुझ्या अदा ...

नजरेस पडता तुझ्या अदा 
मन झाले तुझ्यावर फिदा 

तुझ्या डोळ्यांनी जादू केली 
माझ्या डोळ्यातील झोप नेली

तुझ्या गालाची खळी खुलली 
माझ्या हृदयात कळ उठली 

तू टाकलास कटाक्ष तिरका 
मी झालो मलाच परका 

पडता तुझे पाऊल पुढे 
मज हृदयी श्वास अडे 

प्रश्न तिचा," कुठे हरवलास ?
पाहून मजला का भांबावलास?"

प्रश्नाने तिच्या पडले कोडे 
परमेश्वर घालतो का कधी भक्ताला साकडे