Sunday, January 2, 2011

'एक तरी फांदी जगवावी'


सन २०११ या वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने टोरोंटो येथील श्री गणेशयाग परिवाराने 'वर्षारंभ' हा अभिनव कार्यक्रम सादर केला. त्यावेळी उपस्थित रसिकांना दिलेले एक निवेदन आज मी ब्लॉगवर देत आहे. अभिनव पद्धतीने गेली तीन वर्षे नव वर्षाचे स्वागत करताना परिवाराने केलेल्या अल्पशा कामाची माहिती मी आपणास देत २०११ च्या ब्लॉग लिखाणाची सुरवात करीत आहे. आरण्य वर्षाच्या निमित्ताने जे सुचले व रसिकांसमोर मांडले, ते आपणा सर्वांसाठी सादर करीत आहे.


गेली दोन वर्षे परिवाराने नववर्षाचे स्वागत करताना 'पहाटेचे स्वप्न'  आणि 'ॐ नमोजी' असे सर्वार्थाने वैशिष्ट्य पूर्ण व उद्बोधक कार्यक्रम करून, इंग्लिश  कालगणनेनुसार सुरु होणारे नववर्ष पाश्चिमात्त्य जगात देखील आपण आपली संस्कृती जपत साजरे करू शकतो,आणि त्यास ३१ डिसेंबरची उत्तर रात्र देखील अडथळा  ठरू शकत नाही, याची प्रचीती परिवाराच्या भक्तांना  दिली आहे. खरेतर भक्तांनी ती स्वतःच अनुभवली आहे. या वर्षी पंचसूक्त गणेश पूजा, विश्वदिनाच्या निमित्ताने 'घंटानाद' या विषयाची थोडक्यात माहिती व 'आरोग्यासाठी योग' असा कार्यक्रम झाला. २०११ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय आरण्य वर्ष' म्हणून साजरे करण्यात येत असल्याने या विषयावर पुढील उद्बोधक माहिती मी प्रेक्षकांना लेख स्वरुपात पुरविली. 


तिसऱ्या सहस्त्रकातील पहिले दशक संपून दुसरे दशक सुरु झाले. आपले सर्वसाधारण आयुष्यमान ८० ते १०० वर्षांचे असते असे गृहीत धरले तर ही सहस्त्रके खूपच दीर्घ वाटतात. आपले आयुष्यमान निश्चित नसूनही आपण सहजतेने भविष्यकालीन योजना आखून त्याचा पाठपुरावा  करीतच असतो. या जगण्याच्या सहजवृत्तीतून नियोजनाची सुरवात झाली. त्यातूनच निसर्गतील  ऋतूचक्रांच्या बदलांचे स्वागत करण्यासाठी सणवार साजरे करण्याची पद्धत आली. पुढे हे असे का? अशा चौकस वृतीला उत्तर  देताना आपले अज्ञान उघड होऊ नये म्हणून माणसाने या सणवारांची सांगड रूढी, परंपरा यांच्याबरोबर घातली. हे थोडेसे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे युनायटेड नेशन्सने सन २०११ हे आंतरराष्ट्रीय आरण्य वर्ष  - International Year of Forests - म्हणून घोषित केले आहे. 

दर वर्षी ते वर्ष एखाद्या विषयाला, एखाद्या संकल्पनेला वाहून साजरे करण्या मागे काही उद्देश असतो. अल्प कालावधीतील फायद्याचा विचार करताना माणसाने ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक धोक्यांची जाणीव सर्व मानवजातीस व्हावी, असा सार्वजनिक हिताचा विचार या वर्ष संकल्पनेमागे असतो. या संकल्पनेचा भाग होऊन आपण सन २०११ या आरण्य वर्षाची माहिती घेऊ.

माणूस जितका निसर्गाच्या जवळ जाईल तितका सुखी होईल. हे त्रिकालाबाधित  सत्य माणसाला समजले /उमजले  पण तरीही ते त्यांनी स्वीकारले नाही. त्यातून त्याने निसर्गाचे जवळ न जाता त्यावर अतिक्रमण केले. या बाबतीत सर्व मानवजात - काळा-गोराश्रीमंत-गरीब, विकसनशील अथवा विकसित देशाचा रहिवासी - प्रत्येकजण समान दोषी आहे. प्रथम आपल्याकडून होत असलेल्या विध्वंसाची कारणे सांगतो. अरण्ये नष्ट होण्यामागे संपत्तीचे असमान  वाटप, भ्रष्टाचारवाढती  लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि अनियोजित जागतिकीकरण ही प्रमुख कारणे आहेत. म्हणजेच या घटनेत आपण सर्वचजण अपायकर्ता आहोत. 

आता आपण उपायकर्ता म्हणून काय करू शकतो, ते पाहुयात. खरेतर आपल्यापैकी प्रत्येकास स्वतःची काही वेगळी कल्पना राबवता येईल. पण परिवार नेहमीप्रमाणेच या विषयातील मार्गदर्शनासाठी भारतीय संस्कृती आणि आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाच्या ठेव्याकडे वळू इच्छितो. भारतीय संस्कृतीमध्ये पुराणकाळापासून नक्षत्र वन ही संकल्पना अस्तित्वात आहे. प्रत्येक नक्षत्रासाठी एक वृक्ष आराध्य दैवत म्हणून नेमला आहे. याच अनुषंगाने आपण आपली वनसंपत्ती जपण्याचा संकल्प करीत यावर्षी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्याचा संकल्प करुया. आपण राहत असलेल्या परिसरात एक वृक्ष लावणे व जोपासणे असा प्रथम संकल्प करू.

परिवाराने  रण्य  वर्षाची वाट    पाहता यापूर्वीच सरकारी पातळीवर झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात  यशस्वीपणे सहभाग घेतला आहेच. यावर्षी जागतिक  पातळीवर  हा प्रयोग  अधिक  प्रभावीपणे  पुढे नेण्यासाठी आपण एक पुढचे पाऊल उचलण्यासाठी एक अभिनव उपक्रम करूयात. आपण राहतो त्या ठिकाणी वृक्ष लावून झाल्यावरआपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी आपल्या भारतातील निवासस्थानी दोन वृक्ष लावण्याचे ठरवू. ते करताना आपण ज्या नक्षत्रावर जन्मलो आहोत त्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आणि आपल्या नावाच्या अद्याक्षाराची एक औषधी  वनस्पती लावण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या यानंतरच्या पहिल्या भारतभेटीत हे वृक्षारोपण करण्याचा संकल्प आजच्या शुभ दिनी करू यात. आपणास या संकल्पाची पूर्तता करणे सोपे जावे म्हणून आम्ही आपणास नक्षत्राचे नाव व त्याचा आराध्य वृक्ष कोणता, आणि औषधी वनस्पतीची नावे यांचा तक्ता सोबत देत आहोत. दोन्ही तक्ते विकिपीडियाया संकेत स्थळावरून घेतले आहेत. या माहितीसाठी त्यांचे आम्ही ऋणी आहोत. वृक्षवल्ली आम्हा सोयरीअसे संतांचे सांगणे, केवळ ऐकण्याऐवजी त्या दिशेने प्रत्यक्ष पाउल उचलून 'एक तरी फांदी जगवावी' अशी कळकळीची विनंती परिवार आपल्याला करीत आहे. अरण्य वर्षाच्या निमित्ताने अधिक सांगणे न लगे.
  
          
वेगवेगळ्या जन्मनक्षत्रासाठी असलेले आराध्यवृक्ष
नक्षत्र
आराध्यवृक्ष
संस्कृत
हिंदी
इंग्रजी
अश्विनी
कुचला
विषद्रुम
-
Poison nut
भरणी
आवळा
आमलकी
आमल/ अमरो
Emblic myroblan
कृत्तिका
उंबर
उदुंबर
उदुंबर /गुलर
Fig tree
रोहिणी
जांभुळ
-
-
-
मृग
खैर
खदिर
खदिर
-
आर्द्रा
कृष्ण अगरु /कृष्णागरु
कृष्णागरु
कृष्णागरु
Eaglewood(Black)
पुनर्वसु
वेळु
वंश
बांस
Bamboo cane
पुष्य
पिंपळ
अश्वत्थ
पीपर
-
आश्लेशा
नागचाफा
-
-
-
मघा
वड
वट
बड/ वट
Banyan tree
पूर्वा फाल्गुनी
पळस
पलाश
पलाश
-
उत्तरा फाल्गुनी
पायरी वृक्ष
-
-
-
हस्त
जाई
मालति
चंबेली
Spanish Jasmine
चित्रा
बेल /बिल्व
बिल्व
बेल
Bengal Queens
स्वाती
अर्जुन वृक्ष
अर्जुन
कौहा / कोह
-
विशाखा
नागकेशर
-
-
-
अनुराधा
नागकेशर
-
-
-
ज्येष्ठा
सांवर /सांवरी
शाल्मली
शाल्मली / सेवर
Silk cotton tree
मुळ
राळ
अजकर्ण
साल/हेंद
Shorearobustra
पूर्वाषाढा
वेत
वेतस्
बैंत
Rattan(cane)
उत्तराषाढा
फणस
पनस
कटहर
-
श्रवण
रुई
अर्क
आंकडा
Gigantic Swallow wart
धनिष्ठा
शमी
शमी
समी/ सफेद कीकर
Spung tree
शततारका
कळंब वृक्ष
कदंब
कदंब
Kadamb
पूर्वभाद्रपदा
आंबा
आम्र
आम
Mango
उत्तराभाद्रपदा
कडुलिंब
निम्ब/ तिक्तक/ अरिष्ट
नीम
Indian Lilak
रेवती
मोह
मधुक
महुवा
Ellopa Tree


 "औषधी वनस्पती"

अंकोल
कंकोळ
चंदन
नांदरुख
मंदार
शंखाहुली
अंजन
कंबरमोडी
चार (वनस्पती)
नागकेशर वृक्ष
माईणमुळ
शतावरी
अंबाडा
कचोरा
चिकणा
नागचाफा
माका
शमी
अंबाडी
कडु दोडकी
चिक्कू
नागवेल
मायफळ
शिंगाडा
अक्कलकारा
कडुलिंब
चित्रक
नायटी
मालकांगोणी
शिकेकाई
अक्रोड
कढीलिंब
चुका
निर्गुडी
मालती
शिरदोडी
अगरू
करंज
चोपचिनी
निर्मळी
मिरवेल
शिरस
अगस्ता
करडई
मुचकुंद
शिवण
अघाडा
कर्टोल
मुळा
शिवलिंगी
अजगरी
कळंब वृक्ष
जटामांसी
पतंग
मुसळीकंद
शिसव
अजमोदा
कळलावी
जव
पपनस
मेंदी
शेर
अजवला
कांग
जवस
परीपाठ
मेथी
अडुळसा
कांचन
जांभूळ
पवित्र वनस्पती
मैदालकडी
अतिविष
कांटेधोत्रा
जाई
पहाड
मोगलीएरंड
सताप
अनंत वृक्ष
कांडवेल
जायफळ
पांगारा
मोरवेल
सबजा
अननस
काजू
जुई
पायरी वृक्ष
मोह
सहदेवी
अबोली
कापुर
जेपाळ
पारिजातक
मोहरी
सांवर
अमरवेल
कायफळ
जेष्ठमध
पाषाणभेदी
सागरगोटा
अर्जुन वृक्ष
कारले
पिंपळ
साचा
अळंबे
कारिवणा
पिंपळी
रक्तचंदन
सातविण
अळू
कासांळु
टाकळा
पित्तपापडा
रक्तरोडा
सालई
अशोक
कीराईत
टेंदू
पुदिना
रताळे
सालवण
अश्वगंधा
कुचला
टेंभुरणी
पुनर्नवा
रायआंवळा
सुग्रिणी
असाणा
कुटकी
पुष्करमूळ
राळ
सुपारी
अहाळीव
कुडा
पेटारी
रास्ना
सुरण
पांढरा कुडा
डांगर
पोफळ
रिंगणी
सुरु
कुलीथ
डिकेमाली
रीठा
सुर्यमुखी
आंबटवेल
कुहीरी
डुकरकंद
रुई
सोनवेल
आंबटी
केना
डोरली
फणस
रुद्रवंती
सोमवल्ली
आंबा
केवडा
फालसा
रुद्राक्ष
आंबेहळद
कोथिंबीर
रेणुका (वनस्पती)
आइन
कोरफड
तंबाखू
रेवाचिनी
हंसपदी
आपटा
कोरांटी
तवकीर
बकाणनिंब
हरणखुरी
आमसुल
कोहळे
तांदुळजा
बकुळ
हरीक
आलुबुखार
ताड
बचनाग
लवंग
हळद
आले
तालीस
बडीसोप
लव्हाळा
हाडमोडी
आवळा
खजूर
तीळ
बदाम
लाजाळू
हाडसंधी
आस्कंध
खसखस
तुंबा
बांदे
लिंबू
हिंगणी
खैर
तुळस
बाभुळ
लोध्र
हिरडा
तूर
बावची
हिवर
इंद्रावणी
तोंडले
बिबा
इसबगोल
गवती चहा
त्रिधारी निवडुंग
बिब्बा
वईनिवडंग
गहुला
बेल
वड
गहू
बेहडा
वरधारा
उंदिरकानी
गांजा
दर्भ
बोरू
वरी
उंबर
गारंबी
दारुहळद
बोळ
वसु
उटकटारी
गुंज
दालचिनी
ब्राम्ही
वांकेरी
उडीद
गुग्गुळ
दुधी भोपळा
वाघाटी
उतरण
गुलबक्षी
दुर्वा
वायवर्णा
उद
गुळवेल
देवडांगरी
भारंग
वाळा
उन्हाळी (वनस्पती)
गोकर्णी
देवदार
भुईमूग
वावडिंग
उपरसाळ
गोखरु
देवबाभुळ
भोकराचे झाड
वावळा
गोरखचिंच
वासनवेल
गोरखमुंडी
विष्णुकांता
एरंड
धमासा
मंजिष्ठ
वेखंड
धायटी
मखमल
वेत
घायपात
धावडा
मयूरशिख
वेलदोडे
ओट
घासपित्तपापडा
धोत्रा
मराठीचे झाड
वेळु
ओवा
घेवडा
मारवा
वेहकळ
घोळ
मसूर
घोसाळी
महारुख
औदुंबर वृक्ष
महाळुंग


No comments:

Post a Comment